Prashna Maharashtrache LIVE : प्रश्न महाराष्ट्राचे : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी खास बातचित

Prashna Maharashtrache LIVE Updates : एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. यात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संवाद साधला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 May 2022 03:27 PM

पार्श्वभूमी

Prashna Maharashtrache LIVE Updates : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन...More

Hasan Mushrif :दिल्लीच्या धरतीवर राज्यांतील शाळांचा विकास करणार

दिल्लीतील शाळांच्या धरतीवर राज्यातील शाळांचा विकास केला जाणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. दिल्लीमध्ये ज्या प्रकारे सरकारी शाळांमध्ये शिक्षण दिलं जातं, सुविधा दिल्या जातात, त्याच प्रकारच्या सुविधा या राज्यातील सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणार आहेत. कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागातील शिक्षणामध्ये अडथळा आला होता, आता त्यासाठी सर्व ठिकाणी ऑनलाईन, डिजिटल शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आधी मुलांचा कॉन्व्हेंटच्या शाळांकडे जाण्याचा कल जास्त होता, अलिकडे तो बदलत असल्याचं दिसत आहे, सरकारी शाळा चांगल्या होत आहेत, या शाळांतील पटसंख्या वाढताना दिसत आहे.