Prashna Maharashtrache LIVE : भाजप नेते आशिष शेलार यांना सवाल; #प्रश्नमहाराष्ट्राचे पाहा लाईव्ह
BJP Leader Ashish Shelar live एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. यात भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला आहे.
Prashna Maharashtrache LIVE : सरकारी संस्थांचं खाजगीकरण या मागचा मूळ उद्देश आर्थिक ताण कमी करण्याचा आहे, असं भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
आगामी निवडणुकीत महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्रातील समस्यांवर भाजपचं लक्ष असेल असं भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगतलं आहे.
युती तुटल्यापासून भाजपच्या प्रश्नांचा धार वाढली आहे का या प्रश्नावर शेलार यांनी उत्तर देत म्हटलंय की, सत्तेत असतानाही भाजपची प्रश्नांची धार कायम होती.
मुंबईच्या कुलाबा भागातील जुन्या रस्त्यांवर पावसात खड्डे पडत नाहीत. मग मुंबईत बाकीच्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे का पडतात. मंत्री आदित्य ठाकरेंनी डावसचा दौरा करण्याऐवजी कुलाब्याचा दौरा करावा : आशिष शेलार
मुंबई 26 जुलैचा महाप्रलय आला तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे होते असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
आमचा बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास होता. त्यानंतरच्या नेतृत्वावर आमचा विश्वास नाही : आशिष शेलार
25 वर्षात स्वत:च्या पक्षाची पोती भरण्याचं काम शिवसेनेनं केलं, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
शिवसेनेकडे 25 वर्ष मुंबई पालिकेची सत्ता असूनही शिवसेनेनं मुंबईकरांसाठी आवश्यक उपाययोजना केल्या नाही यासाठी शिवसेनेनं मुंबईकरांची माफी मागावी, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
मुंबईत केवळ 35 ते 40 टक्के नाले सफाई झाली आहे. अडीच हजार कोटीचा निधी मिठी निधीत गेला. मिठी नदीत कचऱ्याची बेटं तयार झाली आहे. गजदर पंपिंग स्टेशनच्या मुखावर आणि तीन नाले एकत्र येण्याचा प्रवाहाच्या समोर दगडांचा ढीग जमा झाला आहे. यातून पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होईल, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.
एप्रिलपर्यंत पालिकेने नालेसफाईचं कंत्राटही दिलं नव्हतं. भाजपनं नालेसफाईचा मुद्दा उचलल्यानंतर पालिकेनं पाऊल उचलली. आम्ही नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. आयुक्तांना फोटोसहित अहवाल दिला. महाविकास आघाडीने नालेसफाईच्या कामाची पाहणी केली नाही. मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी भाजपनं वेळोवेळी पाठपुरावा केला.
'भाजप अशांतता पसरवण्याचं काम करत नाही. भाजप आणि संघावर आरोप करताना पुरावे द्या अन्यथा महाराष्ट्राची माफी मागा', असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
पुराव्यांविना संघ आणि भाजपवर गंभीर आरोप करु नये, असं वक्तव्य करत आशिष शेलार यांनी गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे. काही विरोधक आणि संघ ठरवून राज्याचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत, असा आरोप गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी केला. यावर उत्तर देताना शेलार यांनी ही प्रतिक्रिया मांडली आहे.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं की, गेल्या अडीच वर्षात भाजपनं वेळोवळी जनतेची बाजू मांडली. 192 वॉर्डमध्ये पोल खोलच्या सभा घेऊन जनजागृती करण्याचं काम भाजपने केलं.
भोंगा आणि हनुमान चालीसा हे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत का या प्रश्नावर उत्तर देताना शेलार यांनी म्हटलं की, भोंग्यांच्या विषय राज ठाकरे यांनी काढला. त्यावर भाजपने जनतेच्या बाजूने पूरक भूमिक घेतली, असं म्हटलं आहे.
Prashna Maharashtrache LIVE : भाजप आमदार आशिष शेलार लाईव्ह
अडीच वर्षात विरोधी पक्षाने जनतेसाठी काम केलं. कोरोनाच्या लसीकरणात भ्रष्टाचार करु नका, कोरोना रुग्णांच्या उपचार यासाठी भाजपने सत्ताधाऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी भाजपने ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि पाणी प्रश्न या मुद्द्यांचा भाजपनं प्रामुख्याने पाठपुरावा केला.
Prashna Maharashtrache LIVE : एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. यात भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला आहे.
थोड्याच वेळात 'प्रश्न महाराष्ट्राचे' विशेष कार्यक्रमात दुपारी 1 वाजता भाजप आमदार आशिष शेलार हे सहभाग घेणार आहेत.
'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
या कार्यक्रमात दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.
Prashna Maharashtrache LIVE Updates : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.
पार्श्वभूमी
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.
राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग
या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतील. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग घेणार आहेत. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधला जाईल.
दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.
कुठे पाहाल कार्यक्रम?
हा सर्व कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -