औरंगाबाद : भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्य़ांनी औरंगाबादेतील सभेत गोंधळ घातल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप औरंगाबादमध्ये करण्यात आला. या सभेवेळी औरंगाबादमधील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गोंधळ घातला असा आरोप अजित पवारांनी केला.
राष्ट्रवादीची दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात सुरु होती. आज शनिवारी या यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसंच ट्रिपल तलाकवरुनही सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
शरद पवारांच्या आजच्या सभेला आधी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आज अखेर शरद पवारांनी हल्लाबोल यात्रेच्या समारोपावेळी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान जर अशीच प्रथा पाडणार असाल तर भाजपची राज्यात एकही सभा होऊ देणार नाही असा इशाराच धनंजय मुंडेंनी दिला आहे.
शरद पवारांच्या सभेवेळी प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, अजित पवारांचा आरोप
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
03 Feb 2018 05:58 PM (IST)
भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्य़ांनी औरंगाबादेतील सभेत गोंधळ घातल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप औरंगाबादमध्ये करण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -