Sharad Pawar: राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या प्रकरणामध्ये राज्याचे जेष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी (Sharad Pawar) लक्ष घालावं आणि हा प्रश्न सोडवावा अशी मागणी ओबीसी समाजाकडून मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू राज्यात सुरू आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आरक्षणासाठी सातत्याने आंदोलने, उपोषणे करत आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी लक्ष्मण हाकेसह त्यांंच्या सहकाऱ्यांनी देखील उपोषण केलं होतं. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी भुजबळांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील शरद पवार यांना पत्र लिहिले आहे.


आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत, या बचाव यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहिले आहे. शरद पवारांच्या सहभागी होण्याची मी वाट पाहत असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं आहे. 


ओबीसी आरक्षण बचाव यात्रा 25 जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. काल मंत्री छगन भुजबळ यांनाही ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी निमंत्रित केले होते. आंबेडकर यांचे निमंत्रण स्वीकारून हे नेते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणार का? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. ही यात्रा मुंबई येथून 25 जुलै रोजी निघणार असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना आणि औरंगाबाद येथे यात्रेचा समारोप होणार आहे. 


प्रकाश आंबेडकरांच्या या पत्रावर शरद पवार (Sharad Pawar) काय निर्णय घाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहेत. अशातच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. तर या पत्रामुळे शरद पवार कोंडीत सापडल्याचं दिसून येत आहे. शरद पवार आंबेडकरांनी आयोजित केलेल्या यात्रेत सहभागी झाले तर मराठा समाज पवारांवर नाराज होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये सहभागी नाही झाले तर ओबीसी समाज नाराज होण्याची शक्यता आहे.


मुंबई येथून 25 जुलैला ही यात्रा निघणार


ही यात्रा मुंबई येथून 25 जुलै रोजी निघणार असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना आणि औरंगाबाद येथे यात्रेचा समारोप होणार आहे.