एमआयएम संविधानाची शपथ घेऊन काम करतं त्यामुळे आम्ही एमआयएमला धर्मनिरपेक्ष मानतो. एमआयएमसाठी आम्ही दरवाजे कधीच बंद केलेले नाहीत. त्यांनी दरवाजे बंद केलेत आणि त्यांनीच दरवाज्याला टाळे लावले आहेत. त्याची चावी त्यांच्याकडेच आहे. एमआयएमसोबत आमच्या समितीची बोलणी सुरु आहेत. ती व्यवस्थित झाली तर सगळं व्यवस्थित होईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
VIDEO | काडीमोडानंतर वंचित आणि एमआयएम पुन्हा एकत्र येणार? | एबीपी माझा
दरम्यान 10 सप्टेंबरला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीवंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं. इम्तियाज जलील यांनी घेतलेली भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केलं आहे.
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी एमआयएम आणि वंचितच्या युतीबाबत भाष्य करत नाहीत, तोपर्यंत आमची युती कायम असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. मात्र आता ओवेसी यांनीच पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने वंचित आणि एमआयएम विधानसभा निवडणूक वेगवेगळे लढणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
VIDEO | वंचित आघाडी कोणी बिघडवली? ओवेसी-आंबेडकर विधानसभेला दूर जाणार? | माझा विशेष | ABP Majha
समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ 8 जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं.
संबंधित बातम्या
- ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत एमआयएमसोबत युती कायम : प्रकाश आंबेडकर
- तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो, इम्तियाज जलील यांचं वंचित आघाडीला आव्हान
- एमआयएम-वंचितमध्ये फूट, एमआयएम स्वबळावर निवडणूक लढणार
- वंचितचे कार्यकर्ते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक : रामदास आठवले