मुंबई : कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने MMRDA ला आज दिले आहेत. कांजूर मार्ग मेट्रो कार शेड चे काम 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच वंचित बहुजन आघाडीने देखील यामध्ये आता उडी घेतलेली आहे. कांजूर मार्ग मेट्रो कारशेड हा विषय राजकीय आहे. त्यामुळे कांजूर मार्ग प्रकरणात कोर्टाने या मध्ये पडू नये अशी विनंती वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. कांजूर मार्ग ही केंद्राची जागा नाही, ती मुंबई इलाक्याची जागा आहे, त्या मुळे ती राज्याची जागा आहे. असं ही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.


दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 17 डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात शेतीसंबंधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत संख्याबळाच्या आधारावर मंजूर करून घेतले आहेत. या नवीन विधेयकामुळे भारतीय शेतकरी अक्षरशः नागवला जाणार असून तो देशोधडीला लागणार आहे. जागतिकीकरण आणि त्यामागून अपरिहार्यपणे येणाऱ्या खाजगीकरणातून शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडीमोलाने विकत घेण्याची मुभा आणि त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात आहे. केंद्र सरकारने हा शेतकरी विरोधी कायदा मागे घेतला पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलेला आहे.


महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कायदा आहे . त्या कायद्या मध्ये महाराष्ट्र सरकारने दुरुस्थी करावी. महाराष्ट्र शासनाने जर पुढाकार घेतला तर इतर राज्य पण या कायद्यात दुरुस्थी करतील. राज्य सरकारने दिल्लीतील आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा देण्या ऐवजी कृतिशील पठिंबा द्यावा . हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत (हमी भाव ) मिळण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद करावी आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.


संबंधित बातम्या :






Kanjurmarg Metro Car Shed | मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानेच मेट्रो मध्ये मिठाचा खडा पडला : फडणवीस