Chhatrapati Sambhajinagar : ओबीसी समाजाला आम्ही आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यायला लावू, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलाय. मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये (OBC Reservation) कायदेशीररित्या समावेश होऊ शकत नाही, तसेच मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil) यांच्या सगेसोयरे या मागणीला देखील आमचा विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. कुणबी हा ओबीसीत (OBC )आहे. त्यामुळे त्यांनी जर कागदपत्र दाखल केले तर त्यांना आरक्षण मिळू शकेल, असेही ते यावेळी म्हणाले.  


राज्यभरात ओबीसी समाजाच्या ज्या संघटना आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणार आहोत. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात आम्ही राजकीय पक्षांना आपली भूमिका घेण्यासाठी लावणार आहोत. कारण आरक्षणाच्या या लढाईत राजकीय भूमिका महत्त्वाची असून त्यांनी एकदा आपली भूमिका स्पष्ट केल्यावर हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये मराठा समाज हा कायदेशीर रित्या समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेत बसावावं. असा आव्हान देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


नात्यागोत्याच सरकारमध्ये जरांगे पाटील यांनी शिरकाव करावा-  प्रकाश आंबेडकर


गोरगरिबांना सत्तेत जायची एवढी संधी आहे, प्रकाश आंबेडकरांनी आमचं म्हणणं ऐकावं असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं, यावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझी त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांना मी सांगितलं, राज्याच्या राजकारणात 169 कुटुंब जी आहे तीच महाराष्ट्रावर राज्य करत आहे. ते सगळे मराठा समाजामधले आहेत. त्यामुळे ते जरी मराठा समाजातले असले तरी ते एक प्रकारे नात्यागोत्याचं  सरकार आहे, असं मी मानतो. या नात्यागोत्याच सरकारमध्ये जरांगे पाटील यांनी शिरकाव करावा, असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना दिलाय.


संघर्ष कसा असेल याच वर्णन मी करू करू शकत नाही -  प्रकाश आंबेडकर


आगामी काळात जिल्ह्यातील जेवढ्या ओबीसींच्या संघटना आहे त्यांच्या सोबत आम्ही बोलणार आहेत. आम्ही त्यांना राजकीय भूमिका घ्यायला लावणार आहोत. त्यांनी त्यांची राजकीय भूमिका घेतली, मग काहीही संभव आहे. आम्हाला प्रथम ओबीसींचे आरक्षणा सुरक्षित करायचंय. राज्यात सध्या ओबीसी-मराठा संघर्ष बघायला मिळत आहे. तोच संघर्ष विधानसभेत देखील पाहायला मिळेल. मनोज जरांगे यांनी 14 तारखेला त्यांची यादी जाहीर करावी. त्यांनी यादी जाहीर केली म्हणजे गरीब मराठ्यांना न्याय मिळायला सुरुवात होईल असं मी मानतो. हा संघर्ष कसा असेल याच वर्णन मी करू करू शकत नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या