मुंबई : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण की, यंदाही मुंबईहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना टोलमाफी मिळण्याची शक्यता आहेत. त्यासाठी उद्या एक बैठकही बोलावण्यात आली आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा प्रयत्न करु अशी माहिती आज (मंगळवार) सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. गेल्या वर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या छोट्या चारचाकी गाड्यांना टोलमुक्ती देण्यात आली होती.
गेल्या वर्षी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालयातून विशेष पास देण्यात आले होते. गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात. त्यामुळे टोलमाफीचा निर्णय झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या छोट्या वाहनांना टोलमाफीची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2017 07:08 PM (IST)
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा प्रयत्न करु अशी माहिती आज (मंगळवार) सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -