मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं आणखी जड झालं आहे. कारण सध्या शिवसेनेकडे असलेलं गृहखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. तर नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन्ही खात्यांपैकी एक खातंही राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासह गृहखातंही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. मात्र गृहखातं आपल्याकडे राहावं यासाठी शिवसेना आग्रही आहे.


मंत्रिमंडळाच्या बार्गेनिंगमध्ये शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्रीपद जरी शिवसेनेकडे असलं तरी सर्व महत्त्वाची खाती हळूहळू राष्ट्रवादीकडे जात आहेत. गृह खातंही आता राष्ट्रवादीकडे गेल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. गृह खातं आणि नगरविकास या दोन खात्यांबाबत सध्या चर्चा सुरु आहे. महापालिकांच्या दृष्टीने नगरविकास खातं शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळे या खात्यांची अदलाबदल होऊ शकते आणि त्याबाबत चर्चाही सुरु आहेत, अशी माहिती मिळत आहे.


महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी सहा मंत्र्यांचं तात्पुरतं खातेवाटप 12 डिसेंबरला जाहीर झालं. त्यानंतर नवीन वर्षाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोणते आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात याची संभाव्य यादीही समोर आली आहे.


शिवसेनेची संभाव्य यादी


रामदास कदम
अनिल परब 
सुनील प्रभू
दीपक केसरकर 
उदय सामंत
तानाजी सावंत 
गुलाबराव पाटील 
आशिष जैस्वाल 
संजय राठोड
सुहास कांदे


काँग्रेसची संभाव्य यादी


अशोक चव्हाण 
पृथ्वीराज चव्हाण 
विजय वडेट्टीवार
वर्षा गायकवाड
यशोमती ठाकूर 
सुनील केदार
सतेज पाटील
के सी पाडवी
विश्वजीत कदम


राष्ट्रवादीची संभाव्य यादी


अजित पवार 
दिलीप वळसे पाटील 
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ 
नवाब मलिक
राजेश टोपे
अनिल देशमुख 
जितेंद्र आव्हाड


 

संबंधित बातम्या