मुंबई : राज्यातील पोलिसांना लवकरच गोमांस तपासणीसाठी पोर्टेबल किट दिलं जाणार आहे. ज्यामुळे गोमांसाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांना मदतच होणार आहे. न्यायवैदक विज्ञान प्रयोगशाळा अर्थातच फॉरेन्सिक लॅबने या किटची निर्मिती केली आहे.


फॉरेन्सिक लॅबनं तयार केलेल्या इलिसा या किटच्या माध्यमातून गोमांसाची तपासणी सहज शक्य होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केवळ अर्ध्या तासात गोमांस आहे की नाही याचा रिपोर्ट देईल. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यावरही मोठ्या प्रमाणावर मांसाची नेआण केली जाते. मात्र पोलिसांना ते गोमांस आहे की अन्य प्राण्यांचं मांस याची पडताळणी करण्यात अडचणी येतात. यासाठी म्हणून हे किट विकसीत करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात गोवंश बंदी कायद्यासोबतच महाराष्ट्र प्राणी सुरक्षा कायद्यातील तरतुदींनुसार बैलाची हत्या करण्यावरही राज्यात बंदी आहे. त्यामुळे बैलाचं मांस असल्याच त्याचीही माहिती या किटच्या माध्यमातून मिळणार आहे.