मुंबई: आयएएस झाल्यानंतर चमकोगिरी करून वाद निर्माण करणाऱ्या पूजा खेडकर (Pooja Khedkar IAS) या आता खऱ्या अर्थाने वादात सापडल्या आहेत. पुण्यातून वाशिमला बदली झालेल्या पूजा खेडकर यांनी यूपीएससीकडे (UPSC) जमा केलेले अपंगत्वाचा दाखलाच फेक (Pooja Khedkar Fake Documents) असल्याचं समोर आलं आहे. पूजा खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅट (CAT) या दोन्ही संस्थांनी विरोध केला होता. तरीही पूजा खेडकरांना नियुक्ती मिळाली. त्यामुळे त्यांच्या मागे नेमकी कोणती राजकीय शक्ती आहे, यूपीएससी सारख्या संस्थेचा विरोध असतानाही त्यांना केंद्र सरकारने नियुक्ती पत्र कसं दिलं असा प्रश्न आता पडतोय. 


दिल्ली एम्सची सहा वेळा नोटीस, तरीही गैरहजर


पूजा खेडकर या 2022 सालच्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड (Visual Impairment Certificate) आणि मेंटल इलनेस असा अपंगत्वाचा दाखला काढला आणि त्या आधारे पोरस्ट मिळवली. महत्त्वाचं म्हणजे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दिल्ली एम्समध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार होती. पण तब्बल सहा वेळा नोटीस पाठवूनही पूजा खेडकर या वैद्यकीय चाचणीसाठी गेल्या नाहीत. 


पूजा खेडकर या व्हिज्युअली इम्पेअर्ड या प्रवर्गातून परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 2022 सालच्या यूपीएससीच्या निकालात त्यांची 743 वी रँक दिसतेय. पण जॉईनिंग करण्यासाठी त्यांनी दाखवलेले अपंगत्वाचं सर्टिफिकेट हे खोटं असल्याचं समोर आलं आहे.


खासगी डॉक्टरांचे सर्टिफिकेट जमा, यूपीएससीचा विरोध  


पूज खेडकरांना यूपीएससीने पहिल्यांदा 22 एप्रिल 2022 दिल्ली एम्समध्ये वैद्यकीय चाचणीत उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. अशा पद्धतीने वारंवार सहा वेळा वैद्यकीय चाचणीस त्यांनी दांडी मारली. शेवटी कुठल्यातरी खासगी डॉक्टरकडून त्यांनी एमआरआय अहवाल दाखल यूपीएससीमध्ये दिला.  


यूपीएससीच्या उमेदवारांची वैद्यकीय चाचण ही दिल्लीतील एम्समध्ये केली जाते. पण पूजा खेडकरांनी एम्समध्ये चाचणी न करता दुसऱ्याच कुठल्यातरी खासगी रुग्णालयातून दाखल केला. मात्र यूपीएससीने त्याला हरकत घेतली.


त्यानंतर पूजा खेडकरांनी त्याला सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल म्हणजे कॅटमध्ये आव्हान दिलं. पण कॅटनेही पूजा खेडकरांच्या नियुक्तीला विरोध केला. 


कोणत्या वजनदार नेत्याचा राजकीय हस्तक्षेप? 


कॅट आणि यूपीएससी या दोन्ही संस्थांनी पूजा खेडकरांचे अपंगत्वाचे सर्टिफिकेट हे बनावट असल्याचं सांगितलं. या दोन्ही संस्थांनी पूजा खेडकरांना नियुक्तीपत्र देऊ नये असं सांगितलं होतं. असं असतानाही पूजा खेडकरांना नियुक्ती मिळाली. 


उत्तीर्ण झलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठी यूपीएससी केंद्र सरकारकडे शिफारस करते. मात्र पूजा खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅटचा विरोध असतानाही त्यांना केंद्र सरकारने नियुक्ती कशी दिली हे अद्याप स्पष्ट होत नाही. पूजा खेडकरांनी खासगी डॉक्टरकडून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या आधारे त्यांना नियुक्ती कशी झाली हादेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.


सर्वसामान्य विद्यार्थ्यावर अन्याय


यूपीएससी परीक्षेसाठी दरवर्षी 6 ते 8 लाख विद्यार्थी बसतात. आपल्या पोराला आयएएस करण्यासाठी, त्याला पुणे आणि दिल्लीमध्ये कोचिंग क्लासेच मिळावा यासाठी कोण बाप जमिनीचा तुकडा विकतो, तर कुणाची आईने स्वतः मंगळसूत्र गहाण ठेवलेलं असतं. कलेक्टर व्हावं, आयपीएस व्हावं यासाठी लाखो विद्यार्थी सर्वकाही सोडून वर्षानुवर्षे अभ्यास करतात. काहींना यश मिळते तर उर्वरित लाखो विद्यार्थी पुन्हा एकदा तयारीला लागतात. अशा परिस्थिती, पूजा खेडकर सारखी चमकोगिरी करणारी श्रीमंत बापाची पोरगी मात्र फेक डॉक्युमेंट्स देऊन, केंद्रात आपले राजकीय वजन वापरून कलेक्टर होते हे दुर्दैव. 


ही बातमी वाचा: