Pooja Chavan Suicide Case: माझी बहीण वाघिण होती, ती असं करु शकत नाही; पूजाच्या बहिणीची इंस्टाग्राम पोस्ट

गोविंद शेळके, एबीपी माझा Updated at: 13 Feb 2021 12:13 PM (IST)

पूजाची छोटी बहीण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून तिने माझी बहिण वाघिण होती, ती असं करु शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

NEXT PREV

बीड : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये अद्याप तिच्या कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पूजाची लहानी बहीण दिया चव्हाणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात पूजाने तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल, असं म्हटलं आहे. दियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट असली तरी ती पोस्ट तिनेच टाकली का? याबाबत पडताळणीसाठी तिच्याशी किंवा तिच्या कुटुंबाशी अद्याप कुठलाही संपर्क एबीपी माझाचा झालेला नाही.


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र यानंतरही कुटुंबातला कुठलाही व्यक्ती या प्रकरणावर बोलायला तयार नव्हता. आता या प्रकरणाला वेगळं वळण आलं असून कालपर्यंत तिच्या घरातून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त होत नव्हत्या. परंतु पूजाची छोटी बहीण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून तिने माझी बहिण वाघिण होती, ती असं करु शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संबंधित मंत्री आणि कार्यकर्त्याचं व्हायरल संभाषण, वाचा जसंच्या तसं!


दियाची इन्स्टाग्राम पोस्ट



दोन दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काहीही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता. फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहीण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की असं काही करेल आणि हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे.-


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल; विदर्भातील मंत्र्यांचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक



मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सुसाईड केलं आहे आणि जरी केलं असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेन. दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब आहे.-



ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी-पप्पाला सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या. ती जर हे सर्व पाहत असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा.-



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.