- संजय राठोडांवर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपची मागणी, वनमंत्री नॉट रिचेबल!
- पूजाच्या मृत्यूचा घटनाक्रम उलगडणाऱ्या बारा ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती, पूजाचा मोबाईल काढून घेण्याच्या सूचना, सखोल चौकशीची फडणवीसांची मागणी
- शरद पवारांच्या हस्ते अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण नको, पडळकरांनंतर भूषण होळकरांची मागणी, संभाजीराजेंनाही शासकीय कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचं आवाहन
- शेतकरी अंगावर येतील या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तटबंदीत, नव्या कृषी कायद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची टीका
- “राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडलं जातंय”, शिवसेनेची 'सामना'तून टीका
- रोहतांगमध्ये क्रीडा प्रशिक्षकासह कुटुंबातील पाच जणांची हत्या, महिलांसह मुलांवरही गोळीबार, पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती
- दिल्ली, जम्मू काश्मिर आणि पंजाब भूकंपाच्या धक्क्याने हादरलं, कझाकिस्तानमध्ये भूकंपाचं केंद्र, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही हादरे
- तब्बल दहा महिन्यांनंतर मुंबईतलं जिजामाता उद्यान खुलं होणार, सोमवारपासून मिळणार प्रवेश, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार
- कोट्यवधी लोकांच्या 'मन की बात' करणाऱ्या 'रेडिओ'चा आज जागतिक दिवस, 2011 साली यूनेस्कोकडून या दिवसाची सुरुवात
10. आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता