Sanjay Rathod Live Updates : मंत्रिपदापासून दूर राहून चौकशीला सहकार्य करणार : संजय राठोड

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर विरोधकांसोबत स्वकीयांचाही मुख्यमंत्र्यावर दबाव वाढला आहे. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत राजधर्माची आठवण करुन दिली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Feb 2021 04:17 PM
मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे, मंत्रिपदापासून दूर राहून चौकशीला सहकार्य करणार : : संजय राठोड
मंत्री संजय राठोड वर्षा बंगल्यावर पोहोचले, मुख्यमंत्र्यासह शिवसेनेचे महत्वाचे मंत्री तिथं उपस्थित

शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बांधावर जाऊन केलेल्या घोषणा विरल्या, बांध आणि शेतकरीही थकले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राजीनामा देतो, चौकशी झाल्यावर मंजूर करा, मंत्री संजय राठोडांची मुख्यमंत्र्यांकडे विनवणी
BIG BREAKING : संजय राठोड यांचा अखेर राजीनामा, मुख्यमंत्र्याकडे सोपवला राजीनामा https://www.youtube.com/watch?v=6HNZGyPUEEY
राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय असं सांगत उद्यापासून तथाकथित अधिवेशन सुरु होणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळत असून चर्चा होऊ नये अशी रणनिती सरकार आखत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यानी केलाय.
वनमंत्री संजय राठोड यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही भेट नाकारली आहे
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पूजा चव्हाण ची चुलत आजी शांताबाई राठोड आज दुपारी तीन वाजता वानवडी पोलीस ठाण्यात जाणार आहे त्यांच्या सोबत तृप्ती देसाई देखील असणार आहे...
पुणे | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी तिची चुलत आजी शांताताई राठोड आज गुन्हा दाखल करणार, शिवाय पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार, फिर्यादीत मंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार, तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलिस स्टेशनला जाणार
तृप्ती देसाई : आज संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाहीतर त्यांची हकालपट्टी करा, सगळे पुरावे असतांना गुन्हा दाखल होत नाही, ऑडिओ क्लिप्स आहेत, त्याबद्दल कारवाई नाही, मंत्र्याला वाचवण्यासाठी सरकार केविलवाणा प्रयत्न करताय

अतुल भातखळकर, भाजप आमदार-- संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता कमी आहे संजय राऊत यांनी राजधर्माची आठवण करून दिलेली नाही फक्त मीडिया मॅनेजमेंट करण्याचा प्रकार शिवसेनेकडून सुरू आहे
राठोडांनंतर मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात?,

मंत्रिपदासाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु ,

पूर्व आणि पश्चिम विदर्भाला मंत्रीपद मिळणार की मुंबईला?

राठोड यांच्या राजीनाम्यानंतर अतिरिक्त मंत्रीपदाचा भार,
दुस-या मंत्र्यावर दिला जाण्याचीही शक्यता ,

मंत्रीमंडळात स्थान न मिळालेल्या नेत्यांची मंत्री पदासाठी तयारी सुरु

राठोड यांच्या राजीनाम्याआधीच विविध नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु
वाशिम: पोहरादेवी येथे महंतांची बैठक सुरू, जितेंद्र महाराज, सुनील महाराज आणि बाबूसिंग महाराज उपस्थित
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पूजाची चुलत आजी शांता राठोड आज गुन्हा दाखल करणार, शिवाय पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार, फिर्यादीत मंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार, तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलिस स्टेशनला जाणार

पार्श्वभूमी

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला आहे. त्याता आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत राजधर्माची आठवण करुन दिली. मात्र त्यांचं हे ट्वीट कुणासाठी आहे, याची चर्चा आता रंगू लागली आहे.


 


संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!" पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील नाराजीचा सूर आळवला आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यांवर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दबाव वाढत चाललाय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


 


मुख्यमंत्री योग्यवेळी योग्य निर्णय घेतील- संजय राऊत


 


छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे स्वराज्याचा राज्यकारभार केला त्याचे आपण पाईक आहोत. सध्याच्या परिस्थितीत राजधर्माचं पालन जर प्रत्येकाने केलं नाही तर हा देश, समाज अडचणीत येईल. महाराष्ट्र धर्म हाच राजधर्म आहे. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन केलं पाहिजे. मात्र तुम्हाला आता जे अर्थ काढायचे ते काढू शकता, असं संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच कुणाला मंत्रिमंडळात ठेवायचं आणि कुणाला मंत्रिमंडळातून काढायचं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यांच्या हातात राजदंडच असतो. कुणावर अन्यायही करणार नाही आणि न्यायही करणार नाही आणि यालाच राजधर्म म्हणतात, हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील आणि ते कोणत्याही दबावाखाली नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.


 


संजय राठोडांच्या राजीनाम्याबाबत भाजप आक्रमक


 


संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने राज्यभर आंदोलन केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्नावर अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजप आक्रमक झालं असून राज्यभरात चक्का जाम आंदोलन केलं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.