मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे, पोलिसांनी स्वत:च या घटनेची दखल घेत फिर्याद दिली.
प्रकरण काय आहे?
वाशिम जिल्ह्यात शेतीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईवरच ट्रॅक्टर घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाशिममधील मुंगळा गावात गुरुवारी शेतीमध्ये पेरणीच्या वादात दोन गटात तुफान बाचाबाची झाली. 40 वर्षापासून हा शेतीचा वाद सुरु आहे. मुंगळा शिवारात कैलास दळवी हे आपल्या कुटुंबासोबत पेरणी करताना गावातीलच राऊत कुटुंब त्याठिकाणी ट्रॅक्टर घेवून आले. शेती कुणाची आहे यावरुन दळवी आणि राऊत कुटुंबात वाद झाला. यावेळी कैलास दळवी यांनी आपल्या आईलाच ट्रॅक्टरसमोर टाकलं. हा प्रकार इथेच थांबला नाही, तर राऊत कुटुंबांने कैलास दळवी आणि त्यांच्या पत्नीला झाडाला बांधून ठेवले.
राऊत कुटुंबांनेदेखील कैलास दळवी यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली.
बातमीचा व्हिडीओ :