Bacchu kadu : छत्रपती संभाजीनगर येथे प्रहाश जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu kadu) हे आज भव्य मोर्चा काढणार आहेत. बच्चू कडू यांच्या मोर्च्याला पोलीसांनी (Police) परवानगी नाकारली होती. तरीदेखील बच्चू कडू मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. मात्र, अशातच आता बच्चू कडू यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांकडून 35 अटी टाकत परवानगी देण्यात आली. 




बच्चू कडू यांच्या मोर्चाला परवागी देताना तब्बल 35 अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये मोर्चा वेळत सुरु करावा आणि वेळेत संपवावा. मोर्चाच्या मार्गात किंवा वेळत कोणताही बदल करता येणार नाही. तसेच मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनाची प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून तपासणी करुन घ्यावी. मोर्चात कोणत्या प्रकारे शांतता आणि कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. वाहने निर्धारीत ठिकाणीच पार्किंग करावीत. मोर्चात वाहने, बैलगाडी घेऊन सहभागी होऊ नये, तसेच मोर्चात डीजे लावू नये अशा महत्वाच्या सूचनांसह एकूण 35 सूचना देण्यात आल्या आहेत. 




बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?



स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीने मंजूर करुन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.


पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे MREGS किंवा राज्याच्या रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात यावीत..


कांद्याला हमीभाव देऊन नाफेडचा हस्तक्षेप बंद करावा. कांदा निर्यातबंदी संदर्भात स्वतंत्र धोरण असावे.


शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पुढील 2 वर्षासाठी कर्जाच्या मुद्दल व व्याजात 50 टक्के माफी देण्यात यावी.




दिव्यांगाना प्रतिमाह 6000 रुपये सामाजिक सुरक्षा वेतन, स्वतंत्र घरकुल योजना, स्वतंत्र स्टॉल धोरण, म्हाडामध्ये 5% आरक्षण, दिव्यांग वित्त महामंडळ, कर्जमाफी व विना मॉर्गेज कर्जवाटप तसेच अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा.


घरकुलासाठी 5 लक्ष निधी असावा. शहर आणि ग्रामीण भागात समान निधी देण्यात द्यावा.


शहीद परिवार, माजी सैनिक, हुतात्मा स्मारक व गड किल्ल्यांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करावे.




आज बच्चू कडू आज महायुतीतून बाहेर पडणार?


दरम्यान, आज बच्चू कडू Bacchu Kadu) हे महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. आता बच्चू कडू काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कडू यांनी सरकारला आज चार वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.


 


महत्वाच्या बातम्या:


वारं फिरलं, वातावरण हेरलं! बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? सरकारला 4 वाजेपर्यंतचा अल्टीमेटम