मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 61 वर्षांचे झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील कोरोनाची आणि पुराची परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना ट्विवटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंना दीर्घायुष आणि आरोग्य संपन्न जीवन लाभो असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीमध्ये भेट झाली होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या दोघांमधील ही पहिलीच भेट होती. त्यावर भाजप-शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज 61 वर्षांचे झाले आहेत. त्या निमित्ताने त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंना दीर्घायुष लाभे आणि त्यांना सर्व कार्यात यश लाभो अशी सदिच्छा लता मंगेशकरांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार, पूरग्रस्तांसाठी शरद पवारांची मोठी घोषणा
- Pornography Case : शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला हायकोर्टाचा दिलासा; 20 सप्टेंबरपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश
- Cinematography Bill 2021: केंद्र सरकार कोणत्याही चित्रपटावर बंदी आणणार? नव्या विधेयकावरुन वाद