बुलढाणा : स्वस्त धान्य दुकानदारांचा आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास गमावून बसलात तर देशात भाजपचं (BJP) सरकार राहणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचे बंधू प्रल्हाद मोदी (Pralhad Modi) यांनी भाजपला दिलाय. बुलढाण्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.   


रेशन बचाव समिती, महाराष्ट्र आणि बुलढाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज शेतकरी लाभार्थ्यांना सोबत घेऊन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधु प्रल्हाद मोदी यांनी लाभार्त्यांचे स्वस्त धान्य बंद केल्याने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  


प्रल्हाद मोदी म्हणाले, "भाजप म्हणतो की सबका साथ सबका विकास. परंतु, हे स्लोगन तुम्ही खोटं ठरवत आहात. दोन लाख स्वस्त धान्य दुकानदारांना रस्त्यावर आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. असे झाले तर कुठून विश्वास राहील. भारत सरकारने हाही विचार करायला पाहिजे की 2024 येत आहे. जर माझ्या पाच लाख दुकानदारांचा आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास गमावून बसलात तर हे समजू नका की देशात भाजपचे सरकार राहील.  


Pm Narendra Modi Brother Prahlad Modi : ...तर आम्ही तुम्हाला बदलू 
"स्वस्त धान्य दुकानदार ही लोकशाहीची किल्ली आहे. आम्हाला दुसरं काही करायचं नाही, फक्त ज्यावेळी महिला राशन घ्यायला येतील त्यावेळी त्यांना सांगायचं की यांच्यावर विश्वास ठेवू नका. सरकारला आमचा इशारा आहे की, तुमचं धोरण बदला अन्यथा राशन दुकानदार हे काळे नाग आहेत. जर धोरण बदललं नाही तर आम्ही तुम्हाला बदलू, असा इशारा प्रल्हाद मोदी यांनी दिलाय. 


Pm Narendra Modi Brother Prahlad Modi : काय आहे प्रकरण?
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील 39 लाख 97000 लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा कायद्यातील तरतूदीप्रमाणे सवलतीच्या दरात धान्य देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेत बुलढाणा जिल्ह्यातील 3 लाख 72000 लाभार्त्यांचा समावेश आहे.  परंतु, 1 जुलै 2022 पासून या योजनेतील लाभार्थ्यांचे प्रथम गव्हाचे वाटप बंद करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या लाभार्थ्यांचे तांदूळाचे वाटप बंद करण्यात आले. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोणत्याच प्रकारचे धान्य या लाभार्थ्यांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारच्या या धोरणाविरोधात लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण झालाय. लाभार्थी धान्य मिळण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांसोबत वाद-विवाद करू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा संघटनेकडून आणि राज्य संघटनेकडून या लाभार्थ्यांना धान्य मिळण्याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु, या निवेदनांची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळेच आज रेशन बचाव समिती महाराष्ट्र आणि जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधरक संघटना यांच्या वतीने बुलढाण्यात मेलाव्याचे आयोजन करण्यात आले. 


महत्वच्या बातम्या


Hasan Mushrif on Chandrakant Patil : शाईफेकीचा दुर्दैवी प्रकार घडायला नको होता, पण दादांची ही सातवी ते आठवी माफी असेल; हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला