PM Modi Shirdi Visit LIVE : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

PM Narendra Modi Shirdi Today LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मोदींनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं, यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Oct 2023 04:44 PM

पार्श्वभूमी

PM Narendra Modi at Shirdi visit today LIVE Updates: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Shirdi visit) आज (26 ऑक्टोबर 2023) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले...More

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री राहिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले.आम्ही त्याच कालावधीत साडे 13 लाख कोटी एमएसपीवर खर्च केले. शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे काम केल असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.