PM Modi Call to Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. ही माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना फोन करत त्यांची विचारपूस केली आहे. शरद पवारांनी स्वत: ट्विट करत या विषयी माहिती दिली आहे.


शरद पवार यांनी  ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.  आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्यतेची विचारपूस करण्यासाठी फोन केला.  तसेच कोरोनाविरुद्धची लढाई तुम्हाला जिंकायची आहे, असेही पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना सांगितल्याची माहिती समोर आले आहे.


 






शरद पवार यांनी सोमवारी ट्वीट करत  माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं पवारांनी म्हटलं आहे. 


 शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच नातू रोहित पवार आणि पार्थ पवार यांनी आजोबा काळजी घ्या असं ट्वीट केलं आहे.


रोहित पवार काय म्हणाले? 


आजोबा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे. आजोबा, काळजी वाटतेय, पण योद्धा कधी पराभूत होत नसतो, असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, 'आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय... योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!'


महत्वाच्या बातम्या