मुंबई : राज्यात लागू झालेल्या प्लास्टिकबंदीचा फटका आता राज्यातील दूध संघांना बसणार आहे. कारण दूध संघासाठी तयार होणारं प्लास्टिक यापुढे महाराष्ट्रात तयार करण्यास उत्पादकांनी नकार दिला आहे.


प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादकांनी हा निर्णय घेतल्यामुळे 15 डिसेंबरपासून राज्यातील दूध संघांवर दुधाच्या पिशव्या उपलब्ध होणार नाहीत. याचा फटका प्रामुख्याने शहरांना बसणार आहे. त्यामुळे यावर सरकारने तात्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याची दूधसंघांकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी यावर शिक्कामोर्तब केलं. मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांकडून या निर्णयावर टीकाही झाली.