पिंपरी चिंचवडमध्ये आयटीआय विद्यार्थ्याची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2019 12:09 PM (IST)
वाल्हेकरवाडी इथे या विद्यार्थ्याचं कुटुंब भाड्याच्या घरात राहत होतं. कुटुंबीय गावाला गेल्यावर त्याने हे पाऊल उचललं.
(प्रातिनिधिक फोटो)
पिंपरी चिंचवड : आयटीआयचं शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. मृत विद्यार्थी 17 वर्षांचा होता. वाल्हेकरवाडी इथे या विद्यार्थ्याचं कुटुंब भाड्याच्या घरात राहत होतं. कुटुंबीय गावाला गेल्यावर त्याने हे पाऊल उचललं. सकाळी पेपर टाकणाऱ्याने खिडकीतून पाहिलं तेव्हा आत्महत्येचा प्रकार समोर आला. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तो मूळचा सोलापूरच्या करमाळा इथला असून औंधमध्ये आयटीआयचं शिक्षण घेत होता. तसंच तो सकाळी घरोघरी पेपर टाकायचंही काम करायचा.