Pimpri Chinchwad Accident News : पिंपरी चिंचवड भागातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. रस्त्याचे सपाटीकरणाचे काम करत असताना रोड रोलरखाली चिरडून एका सहाय्यक अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रोड रोलरच्या मागे उभा असलेला सहाय्यक अभियंता त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. 

Continues below advertisement

अचानक रोड रोलरने रिव्हर्स घेतला आणि संबंधित अभियंता रोड रोलरच्या चाकाखाली चिरडला गेला. यामुळं सहाय्यक अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघाताची संपूर्ण घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पती-पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याची प्रयत्न, भंडाऱ्याच्या पोहरा गावातील घटना

विविध प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोघांनी भंडारा जिल्ह्यातील पोहरा गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. एका दांपत्याचे दागिने बळजबरीनं हिसकावून मारहाण करत त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहरा गावात घडली. धम्मराज मेश्राम (32) आणि भीमराज मेश्राम (29) असं आरोपींचं नावं आहे. दोन्ही आरोपी हे सख्खे भाऊ आहेत. हे दोघेही नुकतेच कारागृहातून बाहेर आले असून त्यांनी पुन्हा एकदा या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न ग्रामीण भागात केला आहे. विरांगणा आणि त्यांचे पती विलास मेश्राम असं दांपत्याच नाव आहे. ज्यांना मारहाण शिवीगाळ करुन दागिणे हिसकावून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. 

Continues below advertisement

भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाचा साताऱ्यात अपघाती मृत्यू 

 
भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला असताना अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. यामुळं दरे गावावर शोककळा परसरली आहे. शासकीय इतमामात जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सिकंदराबाद श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा साताऱ्यामध्ये अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सातारा तालुक्यातील दरे या गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव असे जवानाचे नाव असून त्याच्या पश्चात वडील त्यांची पत्नी आणि नवजात बालक (मुलगी) असा परिवार आहे. वीर जवान प्रमोद यांना आई नसल्यामुळे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते मागील आठ दिवसापूर्वी सुट्टीवर गावी आले होते. यादरम्यान काही कामानिमित्त वाढे फाटा येथे दुचाकीवर जात असताना  पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात जागीच मृत्यू झाला. यामुळं दरे गावासह परळी खोऱ्यात शोककळा पसरली. आज सकाळी प्रमोद यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. या दरम्यानच त्यांच्या पत्नीने लहान मुलीला जन्म दिला. वीर जवान प्रमोद यांची अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वीर जवान प्रमोद यांची पत्नी आणि लहान बाळाला अंत्यविधीच्या ठिकाणी अंतदर्शनासाठी आणण्यात आले. हा क्षण पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. आज दुपारच्या सुमारास त्यांच्यावर शासकीय ईतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! अकोल्यात  407 वाहनाचा भीषण अपघात, दोन शेतमजूर जागीच ठार, 11 जण जखमी, चार जणांची प्रकृती चिंताजनक