पिंपरी चिंचवड : आर्थिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. सुदैवाने आग विझवता आल्याने पती बचावला. दादा डाडर असं पतीचं नाव आहे.

 

हिंजवडीलगतच्या मुळशी तालुक्यातील माणगावातील हा प्रकार घडला. दोघांमध्ये आर्थिक वाद झाल्यानंतर पत्नी नीता डाडरने पतीला जिंवत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत पतीच्या तोंडाला, गळ्याला, छातीला, पाठीला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे.

 

दरम्यान, पत्नी नीता डाडरविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.