हेडलाईन्स


--------------------

1 कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्याकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना मारहाण, 3 दिवसानंतर व्हिडीओ व्हायरल, मारहाणीचा आरोप लाड यांनी फेटाळला

------------------

2 एड्सची भीती दाखवून डॉ.संतोष पोळकडून महिलांचं आर्थिक शोषण, गावकऱ्यांचा आरोप, पोलिसांकडून पोळच्या कारनाम्याचा पंचनामा

-------------

3 मुंबई नाशिक महामार्गावर इस्टीम कारची टेम्पोला ध़डक, एकाच कुटुंबातील 4 ठार

---------------

4 पाकिस्तानात जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखं, मोदींनंतर संरक्षण मंत्री पर्रिकरांचा स्फोटक हल्ला,  अतिरेकी कारवायांवरही हल्लाबोल

-------------------

5 महिलेकडे 14 सेकंद रोखून पाहणे गुन्हा, केरळमधल्या अधिकाऱ्याच्या वक्तव्याला सोशल मीडियावरुन विरोध, चावट नेटिझन्सकडून खिल्ली

-----------------

6 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भाच्याचं आज मुंबईत लग्न, लग्नातल्या पाहुण्यांवर मुंबई पोलिसांची करडी नजर

------------------

7 आलिशान फार्म हाऊस आणि सांताक्रूझमधील ले पेटिटमधून भुजबळ बेघर, ईडीकडून 22 मालमत्तांवर टाच, एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट

--------------

8 बारामतीत तरुणीच्या कुटुंबानं मारहाण केल्यानं निराश तरुणाची आत्महत्या, केवळ फोन केल्यानं मुलीच्या कुटुंबाचा संताप, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल

------------

9 भारताच्या पी. व्ही सिंधूची रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक, सिंधूकडून वर्ल्ड नंबर टू वँग यिहानचा सरळ गेम्समध्ये धुव्वा

-------------------

10 नरसिंग यादवच्या ऑलिम्पिक सहभागावर अजूनही प्रश्नचिन्ह; उत्तेजक प्रकरणात 'नाडा'नं दिलेल्या क्लीनचिटला 'वाडा'चा विरोध

----------------------

एबीपी माझा वेब टीम