पिंपरी चिंचवड : लेकाच्या आत्महत्येने हादरलेल्या माऊलीचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. पिंपरीत राहणाऱ्या दास कुटुंबात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
38 वर्षीय तन्मय दास यांनी आत्महत्या केली, तर या धक्क्याने त्यांची 65 वर्षीय आई शुक्ला दास यांनी प्राण सोडले. पतीच्या निधनानंतर महिला मुलासोबत सांगवीत राहत होती. तन्मय यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं.
तन्मय हे मानसिक रुग्ण होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी औषधं घेणं बंद केलं होतं. सोमवारी दुपारी शुक्ला दास तन्मय यांना रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. तिथे डॉक्टरांच्या भीतीने पळून गेलेले तन्मय रात्री दहानंतर घरी परतले.
रात्री उशिरा तन्मय यांनी स्वतःचा गळा चिरुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक्सटेन्शन बोर्डची वायर पंख्याला बांधून गळफास घेतला. तन्मय यांच्या ओझ्याने पंख्यासह ते मृतावस्थेत खाली पडले.
हे दृष्य पाहून आई शुक्ला यांना हृदयविकाराचा धक्का बसला. याच धक्क्यात त्यांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला काही तरी घातपात झाल्याची शंका उपस्थित झाल्याने सांगवी पोलिसांनी शवविच्छेदन केलं. यात आईला हृदय विकाराचा धक्का आल्याचं निष्पन्न झालं.
लेकाच्या आत्महत्येचा धक्का, पिंपरीत माऊलीचाही हार्ट अटॅकने मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Feb 2019 03:28 PM (IST)
पिंपरीत राहणाऱ्या तन्मय दास यांनी पंख्याला गळफास घेतला. तन्मय यांच्या ओझ्याने पंख्यासह ते मृतावस्थेत खाली पडले. हे दृष्य पाहून आई शुक्ला यांना हृदयविकाराचा धक्का बसला.
(प्रातिनिधिक फोटो)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -