पिंपरीत डोक्यात आणि पोटात चॉपरने वार करुन जीवघेणा हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 25 Feb 2017 09:15 AM (IST)
पिंपरी चिंचवड : चाकण येथील गणेश नाणेकर या इसमावर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. गणेश नाणेकर यांच्या डोक्यावर आणि पोटात चॉपरने वार केले. या हल्ल्यात नाणेकर गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. हल्लाखोर कोण आहेत तसंच या हल्ल्यामागील कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, गणेश नाणेकर यांची यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याने पोलिसांनाही पुढील तपासात अडचणी येत आहेत.