पिंपरीत बारावी निकालाच्या भीतीने सुसाईड नोट लिहून तरुणी बेपत्ता
एबीपी माझा वेब टीम | 25 May 2017 07:51 AM (IST)
पिंपरी-चिंचवड : "मला बारावीचे पेपर अवघड गेले आहेत. मी त्यात नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे", अशी सुसाईड नोट लिहून एक तरुणी घरातून बेपत्ता झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील जुन्या सांगवीत ही घटना घडली आहे. शिवानी राजपूत (वय 19 वर्ष) असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास संगमनगर इथल्या राहत्या घरातून निघून गेली. काल (24 मे) बारावीचा निकाल लागणार आहे, अशी अफवा पसरल्याने शिवानी राजपूतने हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांनी सांगवी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तरुणी हरवल्याची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. संबंधित बातमी बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवांचं पीक