नगरपालिकेने 580 डुकरे पकडण्यासाठी हा निधी खर्च केलाय. मात्र ही डुकरे कुठे पकडली? एक डुक्कर पकडताना आख्खी गल्ली जमा होते मात्र, 580 डुकरे पकडताना कुणालाच कसं समजलं नाही? एवढी डुकरे पकडली तर गावात अजून डुकरांचं प्रमाण कमी कसं झालं नाही, असा सवाल आता विरोधकांनी केला आहे.
दुसरीकडे अजूनही बारामतीच्या काही भागात मोठ्या प्रमाणात डुकरे आहेत. बारामतीच्या पोस्ट ऑफिसमध्ये तर लोक कमी, पण डुकरेच जास्त दिसतात. यावर येथील काही कर्मचाऱ्यांनीही खंत व्यक्त केली आहे.
बारामती नगरपालिकेत तीन महिन्यात नको ती बिले काढून ठेकदारांची घरे भरण्याचं काम सत्ताधारी करत आसल्याची टीका विरोधी पक्षातील नगरसेवक करत आहेत. पण नगराध्यक्षांनी या सर्व आरोपांचं खंडण केलं आहे. तर मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्नावर मौन पाळलं आहे. त्यामुळे विरोधकांच्या या प्रश्नाची उत्तरं समोर कधी येणार, याकडे आता बारामतीकरांचं लक्ष लागलं आहे.