खोपोलीत रानडुकराचा कामगारावर हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 27 May 2018 11:59 AM (IST)
रमेशच्या शरीरावर रानडुकराने चावा देखील घेतला आहे. प्राथमिक उपचारानंतर रमेशला मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
खोपोली (रायगड) : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आदिवासी वाडीवर शौचाला गेलेल्या कामगारावर रानडुकराने हल्ला करुन जखमी केले आहे. या कामगाराच्या शरीरावर चावा घेतल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खोपोलीनजीकच्या शिळफाटा येथील दूध डेअरीजवळ असलेल्या आदिवासी वाडीवरील रमेश डोके हा आज सकाळी शौचासाठी गेला होता. याचवेळेस बेसावध असलेल्या रमेशवर रानडुकराने अचानक हल्ला केला. यामुळे रमेशच्या डोक्याला हाताला आणि पायाला जखमा झाल्या असून त्याला खोपोली येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. रमेशच्या शरीरावर रानडुकराने चावा देखील घेतला आहे. प्राथमिक उपचारानंतर रमेशला मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.