मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त अमितेश सिंह यांचा या समितीमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप तत्कालीन फडणवीस सरकारवर करण्यात आला आहे. या प्रकरणाची ही दोन सदस्यीय समिती तपास करणार आहे.
सत्तास्थापनेच्या नाट्यादरम्यान शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले, असा आरोप करण्यात आला होता. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी फोन टॅपिंगचा आरोप केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.
फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- देवेंद्र फडणवीस
राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिले नव्हते. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होते. माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करुन त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
फोन टॅपिंग ही विकृती - जितेंद्र आव्हाड
पेगासेस आणि फोन टॅपिंगबद्दल भाजप प्रचंड अस्वस्थ आहे. फोन टॅपिंग ही विकृती आहे. ही विकृती का केली याची चौकशी पाहिजे. लोकांच्या खासगी आयुष्यात डोकवण्याची गरज काय आहे. तुमचे आणि माझे राजकीय मतभेद आहे. ही विकृती असून याची चौकशी होत आहे. ही विकृती कोणी केली हे संपूर्ण देशाला आणि जगाला कळाले पाहिजे. पेगासेस विकत घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला होता का? हा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला होता.
संबंधित बातम्या
Phone Tapping | उद्धव ठाकरे, शरद पवारांचं फोन टॅपिंग होत होतं? माझा विशेष | ABP Majha
फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू, फोन टॅप केल्याचा भाजपवर आरोप
Phone Tapping | उद्धव ठाकरे, शरद पवारांचं फोन टॅपिंग होत होतं? माझा विशेष | ABP Majha