Ramraje Naik Nimbalkar : आयुष्यभर भाऊबीज साजरी करणार नसल्याची माहिती विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)  यांनी दिली. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा पुतळा फलटण (Phaltan) येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उभारणार असल्याचं मोठं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं आहे. माझ्या स्वखर्चातून पुतळा उभारणार असल्याचेही रामराजे म्हणाले. 

Continues below advertisement

फलटण तालुक्यात सच्ची माणसे आहेत, वारकरी पंथाची माणसे आहेत

आपल्याला जगाला सांगाव लागेल की, फलटण तालुक्यात सच्ची माणसे आहेत. वारकरी पंथाची माणसे आहेत. मी यापुढे भाऊबीज साजरी करणार नाही. त्या मुलीची आपण सर्व आठवण ठेवा असे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. महिला डॉक्टरचा पुतळा फलटण उपजिल्हा रुग्णालय इथं उभा राहणार असल्याचे निंबाळकर म्हणाले. 

डॉक्टरची आत्महत्या झालेला दिवस हा फलटणचा  काळा दिवस 

डॉक्टरची आत्महत्या झालेला दिवस हा फलटणचा काळा दिवस आहे. डॉक्टरचा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात अर्ध पुतळा उभारणार आहे. फलटण तालुक्यातील डॉक्टरच्या आत्महत्येमुळं तालुक्यातील दहशत संपवली. नाईक निंबाळकर या ब्रँडचे वाटोळं केलं आहे. या ब्रँडला पुन्हा मोठा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ही लढत भाऊबीजेला सुरु झाली आहे. त्यामुळे मी देखील भाऊबीज साजरी करणार नाही त्या मुलीचा अर्ध पुतळा सरकारने नाही केला तर मी माझ्या स्वखर्चातून उभा करणार असे वक्तव्य माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे.

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय?

फलटणच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर 'माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,' असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.संबंधित महिला डॉक्टर फलटणमधील एका हॉटेलमध्ये राहत असलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावूनही तो उघडला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर महिलेने गळफास घेतल्याचे आढळून आले.

महत्वाच्या बातम्या:

Satara Phaltan Doctor Case: फलटण डाॅक्टर युवती प्रकरण; पीएसआय गोपाळ बदनेला पाच दिवसांची पोलिस कोठडी, चौकशीत काय समोर आलं?