मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दराने आज देशभरात उच्चांक गाठला आहे. मुंबईत लीटरमागे पेट्रोलचे दर 81 रुपयांवर पोहोचले असून, डिझेल प्रती लीटर 68 रुपयांवर पोहोचलं आहे.
नागपूरमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकारनं नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात.
पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात 9 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानं आता विरोधकांकडून सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.
राज्यासह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Apr 2018 05:46 PM (IST)
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने आज देशभरात उच्चांक गाठला आहे. मुंबईत लीटरमागे पेट्रोलचे दर 81 रुपयांवर पोहोचले असून, डिझेल प्रती लीटर 68 रुपयांवर पोहोचलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -