महाराष्ट्रात पेट्रोल-डिजेल स्वस्त, अधिभार हटवण्यात राज्य सरकारला यश
एबीपी माझा वेब टीम | 17 May 2016 03:11 PM (IST)
मुंबई: पेट्रोल आणि डिजेलवर लावण्यात येणारा राज्य विशेष अधिभार रद्द करण्यात महाराष्ट्र सरकारला यश आलं आहे. डिझेलवर प्रति लिटर 91 पैसे तर पेट्रोलवर प्रति लिटर 1 रुपया 12 पैसे अधिभार लावला जात होता. मात्र काल मध्यरात्रीपासून हा अधिभार रद्द करण्यात आला आहे. परिणामी महाराष्ट्रात शेजारच्या राज्यांपेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होणार आहे. त्यामुळं राज्यातील पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढून राज्य सरकारच्या महसूलात भर पडणार आहे. दरम्यान काल तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. मात्र केंद्रानं राज्य विशेष अधिभार रद्द केल्यामुळं महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विशेष फरक पडला नाही. काल पेट्रोल 0.83 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 1.26 रुपये प्रति लिटर महागलं होतं. याआधी 30 एप्रिलला दरवाढ करण्यात आली होती. तेव्हा पेट्रोल 1.06 रुपये प्रति लिटर, आणि डिझेल 2.94 रुपये प्रति लिटर महागलं होतं. संबंधित बातम्या: