मुंबई : महाराष्ट्रात इंधनांवरील स्टेट स्पेसिफिक सरचार्ज रद्द करण्यात आला आहे. गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहेत. पेट्रोलचे दर प्रती लिटर 67 पैसे, डिझेलचे दर प्रती लिटर 1.24 रुपये आणि गॅस सिलेंडरचे दर 11 रुपयांनी कमी झाले आहेत.
ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली होती. त्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी यावर तातडीने कारवाई केली.
मुंबईत तेल कंपन्यांच्या दोन रिफायनरी आहेत. या रिफायनरींमध्ये जे कच्चे तेल आयात होते, त्यावर मुंबई महानगरपालिका जकात वसूल करत होती. ही जकात 3 हजार कोटी होती. त्याच्या वसुली पोटी महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांवर तेल कंपन्या स्टेट स्पेसिफिक सरचार्ज वसूल करत होत्या.
जीएसटी लागू झाल्यानंतरही मुंबई महापालिकेने जकात थांबवलं, तरी तेल कंपन्यांनी स्टेट स्पेसिफिक सरचार्ज रद्द न केल्याने ‘फामपेडा’चे अध्यक्ष उदय लोध यांनी ग्राहक संरक्षण खात्याकडे यासंदर्भात 3 जुलैला तक्रार केली होती.
त्यानंतर राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी पुण्यात 7 जुलैला केंद्रीय पेट्रोलियमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे ही मागणी मांडली. त्यानंतर त्यांनी तेल कंपन्यांना येत्या पाच दिवसात स्टेट स्पेसिफिक चार्ज रद्द करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, 10 जुलैपासून स्टेट स्पेसिफिक सरचार्ज रद्द झाला असून, पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचे दर स्वस्त जाले आहेत.