मुंबई : सलग 12 दिवसांच्या इंधन दरवाढी नंतर दोन दिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढले नव्हते. मात्र दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रती लिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल दर 97.34 रुपयांवर पोहोचलं आहे, तर डिझेलचे दर 88.44 रुपये झाले आहे.


वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2021 रोजी राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 83 .71 रुपये होती तर डिझेलची किंमत 73.87 रुपये होती. पण आज 23 फेब्रुवारी 2021 रोजी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.97 रुपये आणि डिझेलची किंमत 81.36 रुपये आहे. म्हणजेच यावर्षी सुरुवातीच्या 54 दिवसात दिल्लीत एक लिटर पेट्रोल 7.22 रुपये आणि डिझेल 7.45 रुपयांनी महाग झाले आहे.


तुम्ही एक लिटर पेट्रोल-डिझेल भरता, तेव्हा सरकारच्या तिजोरीत किती रुपयांची भर पडते?


15 दिवसात किंमती किती वाढल्या?


9 फेब्रुवारीपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू लागल्या. 8 फेब्रुवारीपर्यंत राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 86.95 रुपये होती तर डिझेलची किंमत 77.13 रुपये होती. पण आज 23 फेब्रुवारी 2021 रोजी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.97 रुपये आणि डिझेलची किंमत 81.36 रुपये आहे. म्हणजेच 15 दिवसातच दिल्लीत एक लिटर पेट्रोल 3.98 रुपये आणि डिझेल 4.19 रुपयांनी महागले आहे.


'पेट्रोल-डिझेल की मार, क्या यहीं अच्छे दिन है यार?' युवासेनेचा केंद्र सरकारला पोस्टर्समधून सवाल


राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर




  • मुंबई : पेट्रोल-  97.34 रुपये, डिझेल- 88.44 रुपये

  • पुणे : पेट्रोल- 96.98 रुपये, डिझेल- 86.74 रुपये

  • नाशिक : पेट्रोल- 97.68 रुपये, डिझेल- 87.42 रुपये

  • नागपूर : पेट्रोल- 97.84 रुपये, डिझेल- 88.99 रुपये

  • औरंगाबाद : पेट्रोल- 98.50 रुपये, डिझेल- 89.60 रुपये


Petrol-Diesel Prices: पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?


पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर तीन सोप्या पद्धतीने पाहता येतील.




  1. तुम्ही तुमच्या जिल्हाचं, तालुक्याचं लोकेशन सिलेक्ट करुन किंवा पेट्रोल पंपाचं नाव https://associates.indianoil.co.in/PumpLocator/ या लिंकवर टाकून इंधनाचे दर काय आहेत याची माहिती घेऊ शकता.

  2. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)

  3.  इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.