मुंबई : राज्यात लॉकडाऊन हवं की नको? याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरु केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी साडे पाच महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनबाबत जनतेची काय मत आहेत हे जाणून घेण्यासाठी मनसेनं सहा दिवसांचे सर्वेक्षण सुरु केलं होतं.


राज्यात टाळेबंदीची घोषणा झाली आणि लहान मोठया व्यवसायापासून जवळपास सर्वच व्यवसाय ठप्प झाले. परिणामी अनेकांवर उपासमारीची वेळ आली. राज्यात असे अनेकजण आहेत ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना प्रामुख्याने याचा फटका बसला. या लॉकडाऊनची अनलॉकच्या दिशेने सुरुवात देखील झाली आहे. परंतु अद्याप लॉकडाऊनमुळे नागरिकांना अडचणी येतं असल्याचं समोर आलं आहे आणि यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लॉकडाऊन हवं की नको या अंतर्गत 9 प्रश्नांबाबत 54 हजार 177 नागरिकांचा सर्व्हे केला.


मनसेचे प्रश्न आणि नागरिकांचे मत


1) लॉकडाऊन संपुष्टात आणलं पाहिजे?
होय - 70.3 टक्के
नाही- 26 टक्के


2) लॉकडाऊनचा तुमच्या नोकरीवर नकारात्मक परिणाम झाला?
होय-89.8 टक्के
नाही- 8.7 टक्के


3) बुडालेल्या नोकरी, उद्योग धंद्यासाठी सरकारी मदत मिळाली?
होय- 8.7 टक्के
नाही- 84.9 टक्के


4) मुलांच्या शिक्षणा बाबत घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य?
होय- 32.7 टक्के
नाही- 52.4 टक्के


5) शालेय शुल्काबाबतच्या सरकारी धोरणांची अंमलबजावणी होतेय?
होय- 10.3 टक्के
नाही- 74.3 टक्के


6) रेल्वे,लोकल, एसटी सुरू झाली पाहिजे का?
- होय- ७६.५ टक्के
नाही- 19.4 टक्के


7) लॉकडाऊन काळातील वीज बिलांबाबत समाधानी आहात?
- होय- 8.3 टक्के
नाही- 90.2 टक्के


8) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय मदत मिळाली?
- होय- 25. 9 टक्के
नाही- 60.7 टक्के


मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरद्वारे केलेल्या सर्वेतुन 70.03 टक्के लोकांनी लॉकडाऊन विरोधात मतं नोंदवली आहेत. याबाबत ज्यावेळी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी आशा सर्वेना आम्ही महत्त्व देतं नसल्याचं म्हंटलय.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही गंभीर बाब राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं म्हंटलय तसेच यातून योग्य तो बोध घेऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी देखील मागणी केलीय.


मागील चार महिन्यांपेक्षा सुद्धा जास्त काळ सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचं अक्षरशः हाल झाले आहे. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय. त्यातच भरमसाठ आलेली वीज बिलांमळ सर्वसामान्य नागरिकांनी कुटुंब चालवावीत की लाईट बिलं भरावी असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे सरकार याबाबत योग्य ते पाऊल उचलणार का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.