मुंबई : आम्ही 15 कोटी 100 कोटींवर भारी आहेत असं चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात वारिस पठाणांच्या सभांवर बंदी घालावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवाय वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही जोरदार टीका केली आहे.


कर्नाटकातल्या गुलबर्गा शहरात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. आझादी मिळत नसेल तर ती हिसकावून घेऊ असंही यावेळी वारिस पठाण म्हणाले. एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे. औरंगाबादेत पठाण यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर उतरली आहे. वारिस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपनं त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. या आंदोलनात आमदार अतुल सावे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. वारिस पठाण यांना तडीपार करा नाहीतर तुरुंगात टाका अशी मागणी यावेळी भाजपनं केली आहे.

MIM | आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी, एमआयएम नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य



वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. तर वारीस पठाण यांच्यावर असदुद्दीन ओवेसी यांनी कारवाई करावी आणि त्यांना पक्षातून काढावं तसेच माध्यमांसमोर येऊन सर्व जनतेची माफी मागावी अशा प्रतिक्रिया मुंबई बाग येथे बसलेल्या आंदोलकांनी व्यक्त केल्या आहे. तर वारिस पठाण यांच्या विरोधात पोलीसात तक्रारही नोंदवुन त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितले

काय म्हणाले होते वारीस पठाण ?

आम्ही 15 कोटी मुस्लीम असलो, तरी 100 कोटींना भारी आहोत. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी 15 फेब्रुवारीला हे वक्तव्य केलं. विशेष म्हणजे याप्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती. मात्र, त्यांनी या वक्तव्यावर कुठलाही आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. "केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणं आम्ही शिकलोय. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आलीय. आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या तरी तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. 15 कोटी आहोत पण 100 कोटींना भारी पडू, लक्षात ठेवा, असं पठाण यावेळी म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलंय.

संबंधित बातम्या :

आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहोत, एमआयएम नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य

Shaheen bagh : शाहीन बाग आंदोलनाविरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी