Prakash Mahajan : अयोध्ये मधील लोकांना राज ठाकरे यांच्या बद्दल आकर्षण आहे. राज ठाकरे यांच्यामध्ये अयोध्येचे लोक बाळासाहेबांना पाहतात.  त्यामुळे असली कोण आणि नकली कोण हे लोकांना कळलं आहे असं वक्तव्य मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.


राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या टीका आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणारा विरोध यावर मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल काही नवीन खुलासे केले आहेत.


अयोध्ये मधील लोकांना राज ठाकरे यांच्या बद्दल आकर्षण आहे.    राज ठाकरे यांच्यामध्ये अयोध्येचे लोक बाळासाहेबांना पाहतात.  त्यामुळे असली कोण आणि नकली कोण हे लोकांना कळलं आहे. ब्रजभूषण सिंह हे एकमेव खासदार आहेत त्यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. मात्र त्याठिकाणी भाजपच्या अनेक खासदारांनी या दौऱ्याला समर्थन दिलं आहे, असेही प्रकाश महाजन म्हणाले. 


बाळासाहेब हयात असते तर ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले नसते. दोन दोन वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात जात नाहीत मग तुमचा कारभार कोण करतंय असं म्हणत प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीका केली आहे. तसेच राणा दाम्पत्याच्या बाबतीत जे झालं ते बाळासाहेब असते तर झालं नसतं असेही महाजन म्हणाले. 


संजय राऊतांविषयी प्रकाश महाजन म्हणाले, संजय राऊत एका वर्तमान पत्राचे संपादक आहेत आणि ते गल्लीतल्या पोरांसारख्या शिव्या देतात. त्यांची वैचारिक पातळी संपली आहे आणि त्यामुळे राऊत स्वतःची तुलना बाळासाहेबांशी करतात. राज ठाकरे शिवसेनेत असताना संजय राऊत ही त्यांच्या आखाड्यात होतें संजय राऊत यांच्यासारख्या लोकांमुळेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांमध्ये जमत नाही.संजय राऊत नेमकं राष्ट्वादीत आहेत की शिवसेनेत हेच कळत नाही. 


राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी कोणते कारखाने आणि संस्था काढल्या म्हणत  टीका केली होती.  यावर महाजन म्हणाले, पवारांनी कोणत्या संस्था आणि कोणते कारखाने काढले हे सांगावं. उलट शेतकऱ्यांच्या कष्टातून उभे राहिलेले कारखाने यांनी बंद पाडले असून अजित पवारांनी कधी कुठला मोर्चा काढलाय का, कुठल आंदोलन केल आहे का असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे.


संबंधित बातम्या


Gunaratna Sadavarte : मी पण अयोध्येला जाणार, मलाही साधू-महंतांकडून निमंत्रण; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची माहिती


Brijbhushan Singh यांचा बोलविता धनी नेमका कोण? चावी पवारांनी फिरवली की ही भाजपच्या संतुलनाची खेळी?


भाजप खासदारांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध करु नये : देवेंद्र फडणवीस