मुंबई : देशभरात आज गुरुनानक जयंतीनिमित्त सुट्टी असतानाही सरकारी कार्यालयातील पेमेंट काऊंटर सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/797844750208352257

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्दबातल ठरवल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये या नोटा स्वीकारण्यास मात्र मुभा आहे. त्यामुळे नागरिक आपले थकित कर तसंच बिल भरण्यासाठी गर्दी करत आहेत. परिणामी सरकारच्या महसुलात विक्रमी वाढ झाली आहे. महापालिकांनाही याचा मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे आज सुट्टी असतानाही सरकारी कार्यालयांची पेमेंट काऊंटर खुली राहणार आहेत.

सकाळी आठ ते मध्यरात्रीपर्यंत नागरिकांना सरकारी कार्यालयात वेगवेगळी बिलं भरता करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर एखादं बिल भरायचं असेल तर तुम्ही आजही ते भरु शकता.