पाशा पटेल यांनी लातूरमध्ये पत्रकाराला शिवीगाळ केली होती. मात्र याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही अद्याप अटक करण्यात आली नव्हती. अखेर पोलिसांनी पाशा पटेल यांच्यावर अटकेची कारवाई केली. मात्र पाशा पटेल यांनी काही वेळातच जामीनही मिळवला.
काय आहे प्रकरण?
पेट्रोल दरवाढीवर पत्रकारानं प्रश्न विचारल्यानंतर संताप अनावर झालेल्या पाशा पटेल यांनी पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. लातूर विश्रामगृहात हा सगळा प्रकार घडला होता.
ही घटना घडली त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांच्यासह पत्रकार आणि काही शेतकरीही उपस्थित होते.
‘पेट्रोलची भाववाढ झाली, शहरात येण्यासाठीही शेतकरी आता विचार करेल, सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली का?’ असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर पाशा पटेल भडकले आणि शिवीगाळ केल्याचा दावा पत्रकाराने केला आहे. मला बसून प्रश्न वाचरतो का औकात आहे का, असं बोलत पाशा पटेल यांनी प्रचंड शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झाला आहे.
संबंधित बातमी :