मुंबई : टेरर फडिंगच्या प्रकरणात एटीएसकडून परवेझ झुबेरला अटक करण्यात आले आहे युएपीए (UAPA) अंतर्गत परवेजला अटक करण्यात आले आहे. परवेझ डी कंपनीसाठी टेरर फंडिग करण्यासाठी पाकिस्तानातील अंनिस इब्राहिमसोबत संपर्कात होता. दरम्यान महाराष्ट्र एटीसने (ATS) टेरर फंडिग (Terror Funding) प्रकरणी परवेला 10 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परवेज वेगवेगळ्या नावाने डी कंपनीसाठी ओळखला जातो. परवेज अनेक वर्षापासून फरार होता. अखेर परवेझला अटक करण्यात यश आले आहे.
परवेझचा (वय 47 वर्षे) हा अंमली पदार्थाच्या धंद्यातून तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांमधून मिळालेला पैसा देशात दहशतवादी कृत्य घडवून आणण्याकरता वापरत असल्याचे आढळून आले. परवेझला मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
परवेझ हा अनीस इब्राहिमच्या संपर्कात असल्याचा संशय
परवेझ हा बऱ्याच वर्षांपासून दाऊद इब्राहिम गँगशी संबधित असून तो खंडणी आणि बऱ्याच गुन्ह्यांमध्ये फरारी होता. त्यानंतर तो दुबईला पळून केला. एटीएसने अटक केलेला परवेझ हा अनीस इब्राहिमच्या संपर्कात असल्याचा संशय आहे वेगवेगळी रुपं घेऊन तो अनेक ठिकाणी तो वास्तव्य करत होता. तसेच दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता. आता मोठा सापळा रचून अखेर एटीएसच्या पथकाने परवेझला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. एटीएस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास ATS कडे
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीनं एसआयटीकडून तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. एसआयटीतील काही अधिकारी एटीएसला तपासात सहकार्य करणार आहे. साल 2015 पासून तपास करत असलेल्या एसआयटीला अपेक्षित यश येत नसल्यानं कुटुंबियांनी विनंती केली होती. पानसरे कुटुंबियांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.