Parli Sarpanch Accident Update: राज्यासह सध्या चर्चेत आलेलं बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) रोज नवीन वळण घेत असतानाच बीडमधील आणखी एका सरपंचाचा बळी गेल्याची धक्कादायक बातमी समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका सरपंचाला उडविले होते. या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान टिप्पर चालकाने आहे त्याच ठिकाणी टिप्पर सोडून पळ काढला होता. अखेर पोलिसांनी या टिप्पर चालकाला ताब्यात घेतले असून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Parli Accident Update)


शेतातील काम आटपून सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परळीकडे निघाले होते. याच दरम्यान एका राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परळी पोलिसांनी टिप्पर चालक भोजराज देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून टिप्पर पोलीस ठाण्यात जमा केले. अखेर टिप्पर चालक पोलिसांच्या हाती लागला आहे. हा अपघात की घात? असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.


नक्की काय झालं होतं?


परळीत मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर (Abhimanyu Kshirsagar) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आहे की घातपात आहे? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात आता टिप्पर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हा अपघात होता की घातपात याबद्दल काय पुरावे हाती लागतायत याकडे राज्याचे लक्ष आहे.


सुरेश धसांचे गंभीर आरोप


दरम्यान, अपघातानंतर याबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे. एकीकडे संतोष देशमुख प्रकरण गाजत असतानाच आणखी एका सरपंचाचा जीव घेल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत, याबाबत सुरेश धस यांनी बोलताना हा अपघात आहे की घातपात आहे असा सवाल उपस्थित केला आहे. 


शिर्डीत रविवारी सुरेश धस यांनी याप्रकरणाबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा अपघात झाला की घातपात याबाबत चर्चा रंगल्या आहेत. शनिवारी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली. बोगस आणि अवैध राखेची लूट परळी भागात चालू आहे. रात्री झालेली घटना घातपात की अपघात याचा शोध अजून लागायचा आहे. परळी विभागाची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा राखेचे टिप्पर बंद नाहीत. या अवैध व्यवसायांना परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी याला जबाबदार आहेत, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी शिर्डीत बोलताना दिली आहे.