परभणी-वसमत रोडवर असलेल्या ब्रह्मा अपार्टमेंटमधील राहत्या घरी या युवकाने रविवारी (14 ऑक्टोबर) रात्री केली. मोंढा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी महिलेने पाच ते सहा दिवसांपूर्वी मृत तरुणावर ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा केला दाखल होता. त्यामुळे मी स्वत:चा जीव घेत आहे. तसंच मृत्यूनंतर माझ्या कोणत्याही मित्राला त्रास देऊ नये, असं तरुणाने सुसाईड नोटमध्ये घेतली आहे.
तरुणाची सुसाईड नोट
"मी सचिन नामदेव मिटकरी असं लिहून देतो की, महिलेने माझं आयुष्य बरबाद केलं आहे. कारण तिला माहित असताना की माझं लग्न झालेलं आहे तरी सुद्धा माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आणि मला सतत असे कर नाहीतर तुला बदनाम करेन असं सांगत असे. तिचे अजून दोन मुलांसोबत संबंध आहे आणि ती आरोपी असून माझ्यावर खोटे गुन्हे नोंद केले आहेत. त्यामुळे मी माझा जीव घेत आहे.
सचिन मिटकरी"

टीप : तरुणाच्या सुसाईड नोटमधील महिला आणि इतर दोघांची नावं एबीपी माझाने वगळली आहेत.