परभणी : परभणीत शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणुकीआधी तिकीट वाटपावरुन एका शिवसैनिकाने जोरदार गोंधळ घातला. उमेदवारी डावलल्याने शिवसैनिकाने आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.


"निष्ठावान शिवसैनिकांना डावलून गद्दारांना तिकीट वाटप होत आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांनी पैसे घेऊन तिकीट विकली," असा आरोप सुरेश भिसे या शिवसैनिकाने केला आहे.

त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधीच शिवसेनेत असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, परभणी, लातूर आणि चंद्रपूर महापालिकेसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे तर 21 एप्रिलला मतमोजणी होणार होईल. या महापालिकांसाठी 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर 7 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

लातूर महापालिकेत सध्या काँग्रेसची सत्ता आहे तर परभणीत राष्ट्रावादी तर चंद्रपुरात भाजपची सत्ता आहे.

परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 65

राष्ट्रवादी काँग्रेस- 30

काँग्रेस- 23

शिवसेना- 8

भाजप- 2

अपक्ष- 2