Parbhani Selu News Updates: परभणीच्या सेलुतील 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार (minor girl rape in Selu)प्रकरणातील आरोपी दोन दिवसांनंतरही फरार आहेत. यामुळं नागरिकांना संताप अनावर झाला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ उद्या सेलू बंदची हाक देण्यात आली आहे. दोन अज्ञात आरोपी दुचाकीवरून पीडित चिमुरडीला भावासह घेऊन गेले. त्यांनी भावाला एका ठिकाणी सोडून मुलीवर अत्याचार केला. या घटनेला आता 48 यास उलटले आहेत. या प्रकरणी अनेक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र अद्याप ही आरोपी फरार आहेत.


5 सप्टेंबर रोजी सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास शहरातील एका भागातून दहा वर्षीय बालिका आणि दहा वर्षीय तिचा मावसभाऊ हे दोघे आपल्या घराकडे येत होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांनी त्या दोघांना मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवले. या बालिकेच्या मावस भावास एका रस्त्यात सोडून देत 10 वर्षीय बालिकेस घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आणि तिथेच सोडून दिले. या प्रकरणात पीडित बालिकेच्या आईने सेलू पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून 2 अज्ञात आरोपींविरुद्ध पोक्सोसह विविध कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


दोन दिवसांनंतरही अद्याप पोलिसांच्या हाती ठोस काहीच नाही


या प्रकरणात पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी अबिनाश कुमार याच्यासह सेलू आणि जिंतुर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणात लक्ष देऊन तपास करत आहेत. अनेक जणांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे, परंतु अद्याप पोलिसांच्या हाती ठोस असे काही लागलेले नाही.


या प्रकरणातील 2 सीसीटीव्ही आले समोर 


या प्रकरणातील 2 आरोपी या बहीण भावांना घेऊन जात असतानाचे एक सीसीटीव्ही समोर आले आहे. ज्यात एक जण गाडी चालवतोय आणि हे दोन्ही चिमुकलेमध्ये बसवले आहेत तर एक जण त्यांना धरून मागे बसला आहे. दुसरा सीसीटीव्ही एका ठिकाणी हे दोन आरोपी आलेले असतानाचा असून त्यात ही लहान मुलं त्यांच्या समवेत दिसत नाहीत. जो घटनेच्या आधीचा असण्याची शक्यता आहे.


उद्या सेलू बंदची हाक 


सेलूमध्ये भर दिवसा अशा प्रकारे चिमुकलीला घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या सेलू बंदची हाक विविध सामाजिक संघटना, पक्षांनी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: