Parbhani Rain : राज्यात पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर (Flood) आले आहेत. त्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. तर काही ठिकाणी या पुराच्या पाण्यात लोक वाहून गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. परभणीच्या (Parbhani) सेलू तालुक्यातील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. सेलूच्या राजावाडी गावातील पुलावरुन दुचाकी सहित हे दोन जण वाहून गेले आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल
परभणीच्या सेलू येथील राजावाडी गावात दोन जन मोटार सायकलवरुन गावाकडे येत असताना राजवाडी पुलावरुन वाहून गेल्याची घटना घडली आहे. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत असल्याने काल सकाळपासून धरणाचे चार दरवाज्यातून पाणी सोडले आहे. त्यामुळं दुधना नदी पात्रावरील राजवाडी गावलगत असलेला पूल आणि ईरळद गावाजवळील पुल कमी उंचीचा असल्यानं पुलावरुन पाणी वाहात असताना नागरीक धोकादायक वाहतूक करत आहेत. यापैकी एक व्यक्ती वालूर येथील तर एक जण गुळखंड येथील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी सेलूचे तहसीलदार तसेच महसूल चे पथक पोहोचले असून वाहून गेलेल्यांचे शोधकार्य सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
हवामानाच्या स्थितीचा दुर्मिळ योग! राज्यात एवढा पाऊस पडण्याचं कारण काय? नेमकं काय म्हणाले हवामान अभ्यासक?