Hingoli Rain News : सतत सुरु असलेल्या पावसामुळं पैनगंगा नदीला पूर (Painganga River Flood) आला आहे. पैनगंगा नदीच्या बॅकवॉटरमुळं गंगापूर गावातील शिवारात असलेल्या एका शेतातील झोपडीला पुराने वेढा मारला होता. या पुरामध्ये शेतात कामानिमित्त गेलेल्या  शेतकऱ्यासह सहा शेतमजूर अडकून पडले होते. हे शेतमजूर कालपासून या ठिकाणी अडकून पडले होते. यामध्ये एक महिला दोन मुलांसह तीन पुरुष या पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना पुरातून बाहेर काढण्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाचा दुर्लक्षपणा  दिसून आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती जिल्हाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधीपासून पूर्णपणे लपवून ठेवली होती.

पुरात अडकलेल्या सहा शेतमजुरांना 48 तासानंतर पुरातून बाहेर काढण्यात यश आल आहे. महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती का लपवली? हे अजून समजू शकलं नाही. पुराच्या पाण्यातून सुटका केल्यानंतर शेतमजुरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

मुंबईतही सध्या मुसळधार पाऊस, लोकल सेवेवर परिणाम

मुंबईतही सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसला असून ठाण्याकडून मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे सेवा सुरळरीत करण्यात आल्यावर प्रशासनाकडून पुढील सूचना देण्यात येतील. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असल्याचे पहायला मिळत आहे. फलाटावर या संदर्भात रेल्वेप्रशासनाकडून सूचना करण्यात येत आहे.

मुंबईत पडतत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे सकाळपासूनच रेल्वे सेवा ठप्प झाल्या आहेत. अप मार्गाने येणाऱ्या गाड्या या ठाण्यापर्यंतच सुरू आहेत. ठाणे ते मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या या रद्द करण्यात आल्याचं सर्व स्टेशन्सवर अनाउंसमेंट केली जात आहे. 

नांदेडमध्ये ढगफुटीसारख्या पावसाने 8 बळी

नांदेडच्या लेंढी प्रकल्पाच्या पाणलोटात रात्री अडीचपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे मुखेड तालुक्यातील पाच ते सात गावांना पाण्याचा वेढा पडला आहे .नांदेडमध्ये पावसाने 8 बळी घेतले आहेत. मुखेड तालुक्यातील रावणगाव, हसनाळ, भासवाडी, वडगाव भेंडेगाव या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला असून घरे पाण्याखाली गेली आहेत. 300 हून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे . पावसामुळे या भागात मोठे नुकसान होत असताना मुखेड मतदार संघाचे आमदार 24 तास उलटून गेल्यानंतर गावात पाहणीसाठी आले . त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Nanded Heavy Rain: नांदेडमध्ये ढगफुटीसारख्या पावसाने 8 बळी, आमदार 24 तासांनी मुखेडमध्ये उगवले, चेहरा दिसताच ग्रामस्थ संतापले