परभणी: परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदाच्या सगळ्यात जास्त जागा जिंकत जिल्ह्यात आपलं वर्चस्व मिळवलं आहे.


जिंतूर

जिंतूरमध्ये राष्ट्रवादीनं १३ जागा मिळविल्या असून राष्ट्रवादीच्या सबिया फारुकी या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहे. तर काँग्रेसनं १० जागा मिळवल्या आहेत. त्यामुले काँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

सेलू

सेलूमध्ये जनशक्ती आघाडीला सर्वाधिक 12 जागा मिळाल्या असून त्यांच्याच पक्षाच्या विनोद बोराडे यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारली आहे. इथं काँग्रेसनं ५,  शिवसेनेनं ४, अपक्ष १ आणि  राष्ट्रवादीनं दोन जागा मिळवल्या आहेत.

मानवत

नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या शिवकन्या स्वामी या विजयी झाल्या असून त्यांनी काँग्रेसच्या बाबूराव नागेश्वर यांचा पराभव केला.   इथं शिवसेनेनं तब्बल 10 जागा पटकावल्या असून काँग्रेसनं 9 जागा मिळवल्या असून काँग्रेस भाजपला तर आपलं खातंही उघडता आलेलं नाही.

सोनपेठ

नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या जिजाबाई राठोड यांनी विजय मिळवला. तर काँग्रेसनं १२ जागा मिळवल्या आहेत. राष्ट्रवादीनं ५ तर शिवसेना आणि भाजपला आपलं खातंही खोलता आलेलं नाही. जिल्ह्यातील सेना आणि भाजपने युती करत उमेदवार दिले होते. आमदार, खासदार यांनीही आपलाही प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण मतदारांनी त्यांना नाकारत पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातात सत्ता दिली आहे.

पाथरी

नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मीना भोरे यांची निवड झाली त्यांनी काँग्रेसच्या गोदावरी कांबळे यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीने इथं एकहाती सत्ता मिळवली असून २० जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेनेला आपलं खातंही खोलता आलेलं नाही.

पूर्णा
नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या गंगाबाई एकलारे या विजयी झाल्या असून शिवसेनेनं 6 जागा मिळविल्या असून राष्ट्रवादीनं 8 जागा मिळवल्य आहेत. इथं तब्बल 5 अपक्ष निवडून आले आहेत. तर काँग्रेसनंही 1 जागा मिळवली आहे.

गंगाखेड

नगरपालिकेत काँग्रेसच्या विजयकुमार तापडिया यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून त्यांनी भाजपच्या रामप्रभु मुंडे यांचा पराभव केला. इथं काँग्रेसनं 8 जागा मिळवल्या असून राष्ट्रवादीनं 6 जागा मिळवल्या आहेत. तर भाजपनं 4, शिवसेनेनं 2, रासपनं 3 आणि राष्ट्रवादीनं 6 जागा निवडून आणल्या आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार मधुसूदन केंद्रे यांना मतदारांनी मोठा धक्का दिला आहे. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या मुलाला उभं केले होतं पण मतदारांनी त्यांना थेट चौथ्या क्रमांकावर टाकलं.