मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh Case Update) यांच्या विरोधातला अटक वॉरंट ठाणे कोर्टाने रद्द केले आहे. ठाणे कोर्टाने वॉरंट रद्द करताना परमबीर सिंह यांना कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी  परमबीर सिंह यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.


परमबीर सिंह यांना जेव्हा  तपास अधिकरी चौकशीसाठी बोलावतील तेव्हा सिंह यांनी तपाससाठी उपस्थित राहायचे आहे. तसेच 15 हजाराच्या वैयक्तिक जामीनवार त्यांचे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह तब्बल 234 दिवसांनंतर परमबीर सिंह काल मुंबईत दाखल झाले.  त्यानंतर कांदिवलीत गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज ते ठाण्यात दाखल झालेत. ठाण्यात परमबीर यांच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.


ठाण्यात परमबीर यांच्यावर एकूण तीन गुन्हे 



  1. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन परमबीर यांच्यासह पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन यांनी खंडणी घेतल्याचा शरद अग्रवाल यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी कोपरी पोलिसात गुन्हा दाखल आहे.

  2. परमबीर यांच्या इशाऱ्यावरुनच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी धमक्या देऊन आपल्याकडून साडेतीन कोटी रुपये खंडणी वसूल केल्याचा केतन तन्ना, सोनू जालान, रियाज भाटीचा आरोप केला आहे.  याप्रकरणी ठाणेनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  3. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्याकडून एससी एसटी अॅक्ट अंतर्गत परमबिर सिंह यांच्याविरोधात कल्याण येथील बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परमबीर सिंह तपासासाठी दाखल झाल्याची प्रतिक्रिया परमबीर सिंह यांनी दिली आहे. तसंच तपासात सहकार्य केलं असल्याचही ते म्हणाले. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल, असंही त्यांनी सांगितलं.


 धक्कादायक! गृहमंत्रालयातील गोपनीय महत्त्वाची फाईल चोरीला



संबंधित बातम्या :